दिगांबर गवळी यांना स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयाचा वतीने निरोप..
मारेगाव (27.फेब्रू ) :- तालुक्यातील स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील मुख्याध्यापक दिगांबर बोधनराव गवळी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक अतुल मोघे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एस.एन.नहाते, ए.यू.मोघे ,डी.एम.पोल्हे उपस्थीत होते. उपस्थीत मान्यवरानी मुख्याध्यापक गवळी यांच्या कर्तुत्वाबद्दल गुनगौरव करण्यात आला.
निरोप समारंभात गवळी यांनी बोलताना, ” सर्वानी केलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त करुन सगळ्यांच्या मदतीने जबाबदारी पार पाडू शकलो, अशी कृतज्ञता व्यक्त केली “.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासहेब मानकर,संचालन डी.एम.पोल्हे.तर उपस्थितांचे आभार अमित मोघे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल आसेकर रंजित भगत आणि त्यांच्या सहका-यानी परिश्रम घेतले.



