सिंदेवाही MIDC समोर रस्त्यावर देशी दारू सह स्कूटी पोलिसांनी पकडली
सिंदेवाही तील MIDC समोरील रस्त्यावर देशी दारू सह स्कूटी पोलिसांनी पकडली
* आरोपी फरार
सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव रोड एमआयडीसी जवळ समोरील रस्त्यावर सिंदेवाही पोलिसांनी नाकेबंदी केली असता. आज दुपारी अकरा वाजता तीस मिनिटांनी एक इसम होंडा कंपनीचे ॲक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच – 34 एक्स- 7875 वाटेत रस्त्यावर सिंदेवाही पोलिसांची नाकेबंदी बघून स्कुटी गाडी रस्त्यावर ठेवून तो पळून गेला पोलिसांनी बघताच त्याच्या पाटलाग केला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर ठेवलेले स्कुटी पाहणी केली असता. त्या समोरील बाजूस तीन खाकी रंगाच्या खोक्यात देशी दारू 300 नग. प्लास्टिक शिशा होत्या व एका 100 देशी दारू शिशा होत्या. हे देशी दारू सुपर सानिका राँकेट संत्रा कपंनी होत्या. व देशी दारू सह वाहतूक करण्यास वापरलेले एक्टिवा स्कुटी दोन चाकी वाहन याची एकूण किंमत 1 लाख 10 हजार रुपये असून पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली आहे .फरार आरोपी वर अप.क्र.७०/२०२१ , कलम 65 (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ठोंबरे करीत आहेत. सदरील ही कारवाई नाकेबंदी करून देवानंद सोनुले व मंगेश श्रीरामे यांनी केले आहे.



