स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त परशुराम संस्कार सेवा संघाच्यावतीने अभिवादन
अहमदनगर :- प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतीकारक, हिंदू संस्कृतीचे जनक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त परशुराम संस्कार सेवा संघ बीडच्यावतीने संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील जवाहर कॉलनी येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यास नगरसेवक प्रभाकर पोपळे, समाजसेवक महेश धांडे, अॅड. अक्षय भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जीवन चरित्राविषयी बोलतांना गजानन जोशी म्हणाले की, सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेवून आपल्या संसार संपूर्णत: देशहितासाठी वाहून घेतला, त्यांनी जीवन चरित्र हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा महान तपस्वी क्रांतीकारकारस भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे असे ही ते म्हणाले.
या अभिवादन सभेला महाराष्ट्र उपाध्यक्ष संजयराव कुलकर्णी महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबा पाठक, मराठवाडा कर्मचारी उपाध्यक्ष मनोहरराव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष विनोद रामदासी, जिल्हा युवा अध्यक्ष स्वपनील भानप, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष ओमकार देशपांडे, जिल्हा सह संपर्क प्रमुख लिंबाजी देशपांडे, ब्रह्मण महासंघ अध्यक्ष चंद्रकांत जोशी, आर्य चाणक्य प्रतिष्ठान प्रमोद पुसरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



