जिल्हा परिषद शिक्षक विनोद देवगडकर यांना समाजशास्त्र विषयात पीएच.डी पदवीचा बहुमान प्राप्त
– मारेगाव तालुक्यातील पहिलेच प्राथमिक शिक्षक
मारेगाव (26 फेब्रू) :- तालुक्यातील बोटोणी येथील रहिवासी विनोद माधव देवगडकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपुर कडून समाजशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी घोषित झालेली आहे. त्यांनी ‘यवतमाळ जिल्ह्यातील ‘परधान’ जमातीचे सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात समाजशास्त्रिय अध्ययन’ या विषयावर शोध प्रबंध एस आर मुंडले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरमपेठ,नागपूर येथील सहयोगी प्राध्यापक, डॉ. मोहन नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून विद्यापीठास सादर केला होता. त्यांना नुकतीच बहुमानाची समजली जाणारी पीएच. डी. पदवी घोषित झालेली आहे.
विनोद देवगडकर हे धारणा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक पदावर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात बहुमानाची समजली जाणारी पदवी पीएच. डी. प्राप्त करणारे . त्यामुळे त्याचे शिक्षणक्षेत्रात कौतुक होत आहे.
त्याना संशोधन कार्यात प्रा. डॉ. मारोती राठोड, प्रा.डॉ. संजय गेडाम, प्रा. विजय राठोड, संतोष किनाके, विकास मेसेवार, राजेंद्र घोडाम, अरूण कोवे, प्रमोद कोवे, विजय झाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ते आपल्या यशाचे श्रेय पत्नी, आई, वडील, भाऊ यांना देतात. त्याच्या यशाबद्दल मनोज लांजेवार, सतीश वाठोरे, डॉ सतपाल सोहळे,
सुनिल मनवर, कवडू गेडाम, राहुल परचाके, राजेंद्र पीपळशेडे, किशोर ताटकोंडावार, विजय घोडमारे आणि अनेक मित्रमंडळी व समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.



