गावातील मतदार यादीत नाव नसून रमाई घरकुल योजनेचा लाभ कसा ?
– निमनी ग्राम वर्षांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
झरी-जामनी (24.फेब्रू):- गावातील मतदार यादीत नाव नसून सुद्धा रमाई घरकुल योजनेचा लाभ कसा ? यासाठी गावकरी यांनी गटविकास अधिकारीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार दिली आहे.शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून तसेच बोगस कागदपत्रांची पूर्तता करून रमाई योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली.असून दोषींवर कारवाई कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील आदिवासी बहुल निमनी गावात फक्रू रामदास काटकर नामक व्यक्तीने रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. व त्यांचे बांधकाम सुरू आहे.सदर बांधकाम अतिक्रमण करीत रोडच्या हद्दीत सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फकरू काटकर नामक व्यक्तीचे गावात रहिवासी असल्याचे कागदपत्र किंवा पुरावे गावातील मतदार यादीत नाव नाही. तरीपण त्याला घरकुल मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे .
बोगस घरकुल धारकांना ग्रामपंचायतच्या काही पदाधिकारी सोबत संगणमत करून संपूर्ण कागदपत्र बोगस तयार केले व रमाई योजना घरकुलचा लाभ मिळवून देण्यात आलेआणि तक्रार करण्यात आली आहे .
बोगस रमाई घरकुल लाभार्थ्यांना मदत करणारे पदाधिकारी व लाभार्थ्यांची कसून चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी .
अन्यथा पंचायत समिती समोर उपोषण उपोषणास बसणार असल्याचा इशारा मोहन कनाके ,नरेंद्र वैद्य ,सुरेश मिल्मिले ,राजू पडवेकर ,दीपक निब्रड व श्रीराम शेळके यांनी गटविकास अधिकारी सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत दिली आहे.



