Vidarbh24News

Latest Online Breaking News

अडेगाव ग्रामपंचायतीवर पाचभाई गटाचे वर्चस्व

– युवा नेतृत्व मंगेश पाचभाई यांच्या गटाने केली  अनेक दिग्गजांवर मात

वणी( 24.फेब्रू ) :- तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली अडेगाव ग्रामपंचायतीवर अखेर एका , होतकरू, रक्तदुत मंगेश पाचभाई यांच्या गटाचा विजय झाला असुन , ईश्वर चिठ्ठिच्या माध्यमातून हा विजय घोषित करण्यात आला.यामध्ये पाचभाई गटाचे सिमा लालसरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली असुन ,उपसरपंच म्हणून भाजप गटाचे भास्कर सुर हे निवडुन आले आहे.आज झालेल्या सरपंच पदाच्या दावेदारी साठी ,मोठ मोठ्या दिग्गजांनी आपली शक्ती पणाला लावली होती. परंतु निरंतर केलेल्या  समाज कार्याला जनतेचा कौल मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हे पाचभाई यांच्या गटाने सिध्द करून दाखवले.

राजुर ग्रामपंचायतील जल्लोष चित्र

मंगेश पाचभाई गट आणी भाजपने मिळुन आठ जागेवर विजय संपादन केला होता. परंतु सरपंच पदाच्या चुरशीमध्ये दोन्ही गट वेग वेगळे झाले.आणी अडेगाव ग्रामपंचायतीवर संपुर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले होते.

या चुरशीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश पाचभाई गटांच्या सिमा दत्तात्रय लालसरे यांना ईश्वर चिठ्ठीचा कौल मिळुन सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. या संपूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत, दिग्गजांनवर मात करुन आपल्या सामाजिक कार्याने सर्व काही शक्य करता येते .असे यावेळी बघायला मिळाले.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!