Vidarbh24News

Latest Online Breaking News

मारेगावात देशी दारू सह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

-मारेगाव पोलीसांची कारवाई दोघांना अटक

मारेगाव (23 फेब्रू ):-  शहरातील ए.वाय.जयस्वाल यांच्या देशी दारु दुकानातून  चंद्रपूरकडे ३ अलिशान गाडीत देशी दारू भरून जाण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलीस पथक तथा मारेगाव पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळताच धाड टाकण्यात आली असुन या धाडीत सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारु बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्री सुरू असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातुन अवैध दारुचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असताना मारेगाव शहरातील हाय वे वरिल  अक्षरा बियर बारच्या मागे असलेल्या देशी दारू दुकानातुन समोर उभ्या असलेल्या २ चारचाकी वाहन क्र एम एच ०२, बी जी ४६४३, एम एच ३१, ई ए .४३३८ व एक डिस्कव्हर टू व्हिलर एम एच २९, यु ७०९५ क्रमांकाच्या वाहनामध्ये ३लाख रुपयाची  रॉकेट व डेक्कन कंपणीची देशी दारू भरण्यात आली होती. याबाबतची गुप्त माहीती मारेगाव पोलीसासह उपविभागीय पोलीस पथकाला प्राप्त होताच घटनास्थळी धाड टाकली असता  प्रमोद ठेंगणे वय ३३ व अतुल वऱ्हाटे वय २५ यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.  सध्या मारेगाव शहरात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना येथील   देशी दारू दुकानातुन चंद्रपूर जिल्हात देशी दारु पोहचविण्याचा बेत आखण्यात आला होता.पोलीसाची नजर चुकवून हा अवैध दारुचा पुरवठा करण्याच्या  प्रयत्न सुरू असताना उपविभाग पोलीस पथकाला दारू तस्करी होत असल्याची टिप खबरी कडून प्राप्त झाली होती.

या गोपणीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात येवुन मंगळवारच्या पहाटे ३ चार चाकी वाहनातील देशी दारुचे बॉक्स तथा वाहने असा एकुण १० लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मात्र आरोपी देशी दारू दुकानाच्या वॉल कंपाऊड वरून उडी मारून पसार होण्यात यशस्वी झाले असुन एक लाल चारचाकी वाहनही पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाली, घटनास्थळी प्रमोद ठेंगणे व अतुल वऱ्हाटे याना घटनास्थळी अटक करण्यात आली असुन त्यांचेवर

, मुंबई  दारूबंदी कायदा कलम ६५ ( अ ) ( ई ) ८२, ८३ नुसार कारवाई करण्यात आली आहे, सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ , अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरिक्षक अमोल चौधरी, पो हे कॉ आनंद अलचेवार, ना पो का प्रदीप ठाकरे , विजय वानखडे, इकबाल शेख , रविंद्र इसनकर , परेश मानकर, नितीन खांदवे, शेख कलीम यांनी केली .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!