अबब ….. मोपेड मधून देशी दारू तस्करी करणारा राजुर येथील युवकास अटक
– 30 हजार मोपेड वाहनासह असा एकूण 43000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वणी ( 22 फेब्रू ) : वणी येथील ग्रामीण रुग्णालया जवळ देशी दारुसह एकास अटक केली आहे. सदर युवक हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
सोमवार दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास राजूर येथील सौरभ नगराळे (20) रा. राजूर कॉलरी हा अवैधरीत्या दारू घेऊन जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
त्यानुसार ठराविक वेळेला एक मोपेड वाहन क्रमांक MH29 BG493 या वाहनाला अडवून तपासणी केली. त्या वाहनाच्या समोर देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.
ज्याची किंमत 13 हजार व मोपेड वाहन 30हजार असा एकूण 43000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दारू कुठून घेतली याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की,
जवळच असलेल्या दानव यांच्या देशी दारू दुकानातून घेतली असल्याचे सांगितले आहे. पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



