वणी येथील लग्न समारंभात श्रीराम मंदिराला समर्पण निधी
वणी:- शहरातील सेवानगर येथील राजु तोमस्कर यांचे पुत्र रितेश यांच्या विवाहप्रसंगी नवविवाहित वर-वधू यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी समर्पण निधी समितीच्या कार्यकर्त्यां कडे सुपूर्द केला. 
सेवानगर वस्तीमध्ये श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आहे. या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी बैठक घेऊन प्रत्यक्ष गृहसंपर्क करून समर्पण निधी गोळा केले. यादरम्यान राजू तोमस्कर यांचे कडील विवाहाची माहिती मिळाली.
दरम्यान गृह संपर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंगल निधी विषयी तोमस्कर परिवारातील ज्येष्ठांना सुचविले होते. या परिवारातील जेष्ठांना ही बाब खूप आवडल्यामुळे त्यांनी निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलावून वधू वरांच्या हस्ते समर्पण निधी देऊन एक नवीन उदाहरण समाजासमोर उभे केले आहे.
तोमस्कर कुटुंबाच्या या कृतीमुळे त्यांच्यावर समाजाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



