चांदापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न.
चांदापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न.
कवठी प्रतिनिधी
मुल तालुक्यातील चांदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य झेंडा चौकात शिवगर्जना सांस्कृतिक कला , क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ चांदापूरच्या वतीने शिवजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये इयत्ता १ली व २री च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत वेदांत दिनकर झरकर याने प्रथम क्रमांक व श्रेयस शेषराव पाल ने दुसरा क्रमांक पटकवीला. इयत्ता ३ री व ४ थी च्या विदयार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत साई संजय चल्लावार याने पहिला क्रमांक तर संकल्प शामराव कारमवार दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरला.
इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अ गटातील कु . खुशबु दिलीप ठाकुर हिने प्रथम क्रमांक व कु . अंजली चंद्रकांत चिंचोलकर ने दुसरा क्रमांक तर ब गटातील कु . प्रतिक्षा किसनदास कडूकार ने प्रथम क्रमांक व कु . सलोनी अमोल गुलभमवार ने दुसरा क्रमांक पटकवीला.
खुली गीतगायन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये धनंजय सुनिल कमनपेलीवार ने प्रथम तर कु .पल्लवी विलास झरकर आणि धिरज दिलीप पाल दोघेही दुसऱ्या क्रमांकांचे मानकरी ठरले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे रक्तदात्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , मेडल देऊन गौरव करण्यात आले.व सर्व सहभागी विध्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून मुख्याध्यापिका . सुनिता चल्लावार मॅडम, श्री . रमेश डोंगरवार सर, श्री .नंदकिशोर शेरकी सर, श्री .विनोद कोहपरे सर, व श्री . सुनिल निमगडे सर उपस्थित होते.
इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तक वितरण करण्यात आले . या वेळेस विविध स्पर्धांचे सुत्रसंचलन नवनित चिंचोलकर, वसंत पोटे, अभिजित चिंचोलकर, अंकुश शेरकी, पंकज निशाने यांनी केले . तर प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले . दिलीप पाल, खुशाल शेरकी, राजु पोटे, रवि शेरकी, विनोद कोहपरे यांनी मार्गदर्शन केल तर प्रा.सौ . शिल्पा चांगदेव चिंचोलकर यांनी कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले . या कार्यक्रमासाठी देविदास देशमुख, सुरेश देशमुख, धर्मेंद्र घोगरे, पत्रु पाल, दिलीप पोटे, गोकुळ तिवाडे, व शिवगर्जना मंडळाचे सर्व सदस्य , चांदापूर येथील प्रतिष्ठीत नागरीक,युवक, युवती, महिला आणि बालगोपाल उपस्थित होते . सर्व स्पर्धासाठी श्री किशोरजी शेरकी एपीआय नागपूर, श्री सुधीरजी बोरकुटे पि आय शेगाव, श्री . रविंद्रजी कंकलवार म.पो. गडचिरोली, श्री . संजयजी पाल म.पो. गडचिरोली, नितीनजी शेरकी म.पो. गडचिरोली, रमेशजी पाल म.पो. गडचिरोली, चांगदेवजी चिंचोलकर वनरक्षक चंद्रपूर, श्री दिलीपजी भुरसे सर, श्री नंदकिशोर शेरकी सर चांदापूर हेटी, डॉ .आमितजी आभारे भेंडाळा तसेच शिवगर्जना मंडळातर्फे बक्षिस व पुस्तकाचे वितरण करण्यात आले .
दिनांक २० फेब्रुवारी २०२१ शनिवारला शिवगर्जना बहुउद्देशीय मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले . सर्व रक्तदात्यांना श्री . दिलीप पाल यांचेकडून फळ देण्यात आले .व शिवगर्जना बहुउद्देशीय मंडळाकडून चहा, कॉफी बिस्कीट व नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरदेव सेवा मंडळ चांदापूर, आदर्श बहुउद्देशीय मंडळ चांदापूर, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व सर्व युवकांनी सहकार्य केले.



