वणी येथील जागृत पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर तर सचिवपदी मोहम्मद मुस्ताक यांची सर्वानुमते निवड
– उपाध्यक्ष- विवेक तोटेवार व सहसचिव- पुरुषोत्तम नवघरे
-कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. अमोल टोंगे यांची नियुक्ती
वणी (21.फेब्रू ):-आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी दिनांक 20 फेब्रुवारी ला शासकीय विश्रांम गृह येथे,सभा घेण्यात आली.सभेचे अध्यक्ष जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धांवजेवार होते.यात नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर व सचिवपदी मोहम्मद मुस्ताक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


मराठी भाषेतील दर्पण वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनांक 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोभूर्ले(देवगड,ता-सिंधुदुर्ग) येथे झाला.दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते.म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

याच दिनाचे अवचैत्य साधून जागृत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यात तालुका अध्यक्षपदी संदीप बेसरकर व सचिवपदी मोहम्मद मुस्ताक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यापुढे जागृत पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी विदर्भ अध्यक्ष जागृत पत्रकार संघ,राजू धावंजेवार(विदर्भ मतदार) अध्यक्ष संदिप बेसरकर ( न्यूज आपली वणी,दै.महासागर),सचिव मोहम्मद मुस्ताक(संपादक,सिटी न्यूज)
उपाध्यक्ष विवेक तोटेवार (दै.नवराष्ट्र,वणी बहुगुणी),सहसचिव पुरुषोत्तम नवघरे(दै.मातृभूमी) सदस्य मुन्ना बोथरा (लोकवाणी न्यूज पोर्टल) श्रीकांत किटकुले (दै.लोकदुत) गणेश रांगणकर (लोकमत,नांदेपेरा प्रतिनिधी)
आकाश दुबे(न्यूज आपली वणी) रफिक शेख (प्रेस फोटोग्राफर) प्रविण नैताम (सकाळ,घोंसा प्रतिनिधी) मनोज नवले (आपला हक्क न्यूज पोर्टल) प्रशांतचंदनखेडे (सायरन,वणी सिटी न्यूज पोर्टल),राहुल अहुजा (विदर्भ चंडिका) यांचा समावेश आहे.जागृत पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. अमोल टोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



