वणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला तर्फे ” वाण आरोग्याचं” शिबिर घेण्यात आले
वणी( 21.फेब्रू ) :- आज दिनांक 20 फेब्रू रोजी वणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला तर्फे” वाण आरोग्याचं” शिबिर घेण्यात आले.त्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले.कारण आज महिला आपल्या स्व-आरोग्याकडे लक्ष देत नाही.
त्या आपल्या आरोग्याची काळजी घेतांना दिसून येत नाही. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला तर्फे सर्व महिलांना मोफत तपासणी म्हणून एक मोठ्या स्वरूपाचे वणी लोढ़ा हॉस्पिटल येथे शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात महिलांची बी.पी, शुगर, वजन, सोनोग्राफी आणि त्यांच्या अनेक अश्या आरोग्याची तपासणी डॉ.महेंद्र लोढा आणि त्यांच्या स्टाफ यांनी केली.या शिबिरात ” महिलांना मौल्यवान मार्गदर्शन म्हणून आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
” जान है तो, जहान है ” हे ब्रीद वाक्य दिले .अश्या प्रकारचे महत्व महिलांना पटवून दिले.” यावेळी जयसिंग गोहोकर, राजा बिलोरिया,विजया आगबत्तलवार,आशा टोगे, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले व वैशाली तायडे या सर्व महिला उपस्थित होते.



