नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पकडली देशी दारू
- नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पकडली देशी दारू
गावातील महिला आणि नवयुवक तरुणांची साथ - कवठी प्रतिनिधी
:-चंद्रपूर जिल्हा दारुमुक्ती असताना सुद्धा सावली तालुक्यातील कवठी गावात गेल्या दोन वर्षापासून दारूची सर्रास विक्री सुरू होती त्या मूळे गावातील पुरुष वर्ग आणि लहान लहान मुले पूर्णतः दारूच्या आहारी गेले ले दिसून येत होते आणि गावातील शांतता आणि सुव्यवस्था पूर्णतः नस्ट झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही बाब जय शिवराय युवा मंडळ,महिला वर्ग आणि गावातील नवं जवान युवकांच्या लक्षात येताच मागील काही महिन्यात दारू वाल्याला शांत पणे समजावून सांगून आणि गावामध्ये दवंडी देऊन दारू विक्री बंद करायला लावले आणि त्याला सावध केले की या पलीकडे गावात दारू विकताना किंवा दारू आढळून आल्यास पोलिसांच्या स्वाधीन न करता गावातच निर्णय करू असे सांगितले होते त्या नंतर दारू गावातील पूर्णतः बंद च झाली होती परंतु गावातील ग्रामपंचायत ची निवडणूक होताच गावात लपून छपून दारू विकायला सुरुवात केली ही बाब लक्ष्यात येताच नवनिर्वाचीत ग्रामपंचायत कमिटीने सापळा रचून गुप्त पन्हे माहिती काढत होती की दारू विक्रेता दारू कुठून आणतो , कुठे ठेवतो त्या नंतर दारू कुणाच्या घरी आहे ही माहिती मिळताच सौ लिलाबाई कालिदास भगत यांच्या घरी धाड टाकली आणि शेवटी देशी टिल्लू च्या दोन पेट्या दारू पकडल्या.तिला विचारले असता तिन्हे माझी दारू नसून ती दारू मोरेश्वर पुतनेलवर यांची आहे आणि ती दारू माझ्या घरी ठेवली होती त्या नंतर ठाणेदार राठोड साहेबाना संपर्क केले असता साहेबानी दोन पोलीस पाठवून त्या दोन देशी दारूच्या पेट्यांचे पंच नामा श्री रामकीसन बोत्रे यांनी केले आणी सापडलेल्या मालाची अंदाजे किंमत१२०००/-टाकले - विशेष म्हणजे छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळे आणि मी घरी नसताना त्यांनीच आणून ठेवली असा आरोप सुद्धा केला तिच्याच घरी मिळाल्यामुळे तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आले त्या वेळेस सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच विलास बट्टे, सदस्य कु.राकेश चरणदास घोटेकर ,संगीता पाल, सौ मनीषा कोसरे शितल गोरडवार तंटामुक्ती अध्यक्ष टिकाराम, मशाखेत्री आणि महिला व नवयुवक तरुण वर्ग उपस्थित होते
- पुढील तपास सावली ठाण्याचे ठाणेदार राठोड साहेब करीत आहे आणि आता गुन्हा त्या महिलेवर
- झालेला असून असली दारु विक्रेत्यांवर होईल का?असा सुद्धा प्रश्न कवठी तील जनतेला पडत आहे.



