रथसप्तमी दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे “विधवा महीलांसाठी” हळदी कुंकूचा कार्यक्रम
– राष्ट्रवादी महीलांतर्फे विधवा महिलांसाठी समाजक्रांति म्हणून आदर्श उपक्रम …
–– विधवा महिलांना समाजात मान मिळावा हाच उद्देश्य.
वणी (20.फेब्रू ) :- आज दि.१९/२/२०२१ ला रथसप्तमी दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विधवा महीलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आला . त्यासाठी महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले ,विजया आगबत्तलवार, वैश्याली तायडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.व विधवा महिलांना मान देण्यात आला.
विधवा महिलांना समाजात लग्न समारंभात ,पूजा पाठ असली की विधवा आहे म्हणून दूर का ठेवण्यात येते ? एक आईं आपल्या मुलाला जन्म देते ९ महिने ९ दिवस गर्भात वाढ़वते मग ,
तीच आई विधवा झाली की, त्याचं विधवा आईंला स्वतःचा मुलाचा वाढदिवस की शुभ लग्न प्रसंगी असो का दूर ठेवल्या जाते ? समाजात चालत असलेली ही घृण परंपरा एकविसव्या शतकात नक्कीच बदलली पाहिजे.
हा नियम आपण आज जर सर्व एकत्र येऊन बदलला नाही तर, ही प्रथा युगानुयुग अशीच सुरुच राहील म्हणून आज हा विधवा महिलांसाठी आगळा- वेगळा उपक्रम म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आला .
या वेळी कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्षा शालिनी रासेकार (माजी नगर अध्यक्षा) ,प्रमुख पाहुणे म्हणून आशा टोंगे , विजया आगबत्तलार (जिल्हा उपाध्यक्षा रा. म. कॉ शहर अध्यक्ष ),
सविता ठेपाले (राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा ) ,वैश्याली तायडे ,प्रतिमा वंजारी ,वर्षा ,मंदा ,मुस्कान या सर्व महिला उपस्थित होते.



