राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मूर्धोनी येथे शाखा स्थापना

वणी (20. फेब्रू ): तालुक्यातील मूर्धोनी येथे संत रविदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा फलकाचे अनावरण सोहळा उद्घाटन मा.संतोष मुळे यांच्या हस्ते पार पडला.देशभर चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित असणारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्ह्यात अनेक शाखा स्थापन झाल्या आहेत.
यातच वणी तालुक्यात दुसरी शाखा मूर्धोनी येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.माधवराव गायकवाड यांच्या सूचनेनुसार समाज बांधांवांच्या परिश्रमातून स्थापन झाली.
मूर्धोनी गाव शाखेचे अध्यक्ष म्हणून अमोल डुबे, उपाध्यक्ष सुनील डुबे तर सचिव म्हणून पवन नवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आले,तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे संतोष मुळे व अध्यक्ष म्हणून रवींद्र धुळे तर प्रमुख पाहुणे अमोल बांगडे, गावचे सरपंच प्रशांत भोज ,उपसरपंच साईनाथ तोडासे उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी किसन कोरडे,श्याम गिरडकर,युवराज वाडेकर,पंकज वादेकर,संभाजी डुबे,रमेश नवले,सचिन येरेकर,सुनील डुबे,महेश लिपटे नीता मुळे,सुप्रिया डुबे,शीतल येरेकर,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन नवले,आभार प्रदर्शन महेश डुबे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी नवले,अमित डुबे,वैभव येरेकर,गणेश नवले,प्रफुल डुबे, यांनी परिश्रम घेतले.