वर्दीतल्या ह्या माणसाला सलाम

सिंदेवाही मधील एक अत्यंत गरीब कुटुंब राहत असलेले घर बरोबर नाही शासनाच्या अव्यवस्थित कारभारामुळे घरकुल अर्धवट प्लास्टिक चुंगळी ला कापून त्याच्या खिडक्या बनविलेले अश्या परिस्थितीत आपले जीवन व्यापण करणारा हा कुटुंब हातावर आणून पानावर खाणे. मिळेल ते काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत असलेला हा कुटुंब. कोरोना च्या सावटाने रोजीरोटीही मिळणे कठीण झाले असताना अश्याही परिस्थिती आपल्या मुळीच लग्न २५ फेब्रुवारी ला ठरले होते आता प्रश्न कस कराव ?
मोठी गंभीर परिस्थती उद्भवली असताना सिंदेवाही पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारे साहेबानी स्वरूपात मदतीचा हात दिला. घारे साहेबांच्या अचानक गृह भेटीने व आर्थिक मदतीने हा संपूर्ण परिवार भारावून गेला. घारे साहेबाना सदर परिवाराची माहिती मिळताच त्यांनी कुठलाही विलंब न करता स्वताचा परिवार समजून,स्वतः त्या परिवाराच्या कर्त्यांची भूमिका बजावत त्या परिवाराची आर्थिक मदत केली. एरव्ही लोकांचा समज पोलिसांबद्दल खूप रागिष्ट, कडक आणि भीती दायक वाटतो. पण वर्दीतही एक सामान्य मनमिळावू भावनिक माणूस असतो हे आज घारे साहेबांच्या कर्तृत्वाने आज सामोरे आले. त्यांच्या कडून अजून सत्कार्य होत राहोत अशीच एक आशा.