अवैध नळ कनेक्शनमुळे , वणी येथील विद्यानगरी वासियांची पाण्यासाठी भटकंती
-अवैद्य नळ कनेक्शनमुळे पाण्याची होत आहे नासाडी , नगर परिषदेने यावर आळा घालावा.! अशी विद्यानगरी येथील नागरिकांची मागणी
वणी( 19 फेब्रू ):- मागील (२५) वर्षापासून शहरालगत विदयानगरी नावाची शिक्षक वसाहत वास्तव्यास आली आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक गरज म्हणजे पाणी, परंतु पाणी मिळविण्यासाठी येथील नागरिकांनी, बालकांनी ,वृध्दांना अक्षरशः ३-४ कि.मी.चे अंतर कापावे लागत असे, त्यामुळे त्यावेळचे तत्कालीन आमदार विश्वास नांदेकर यांच्या प्रयत्नातून विद्यानगरी येथील नागरिकांची तहान भागविण्यात यश आले. जलप्राधिकरण विभागा अंतर्गत योजना अस्तित्वात आली होती.तेव्हा पासुन विद्यानगरी येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट संपुष्टात आली होती. 
परंतु मागील दोन वर्षा पासुन, नविन घराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ,नागरिकांचा कल हा विद्यानगरी कडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

त्यामुळे २५ हजार क्षमतेची असलेली पाण्याची टाकी ही ,वसाहतील मोजक्या घरासाठी मर्यादित होती . परंतु लोकसंख्या वाढल्याने नळ कनेक्शन सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

आणी टाकीच्या क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात नळ कनेक्शन वाढल्यामुळे , येथील (२५) वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर नांदेपेरा रोड लगत असलेल्या न्यु विजन काॅन्व्हेंट मध्ये मुख्य पाईप लाईन मधुन अवैद्य नळ कनेक्शन घेण्यात आलेले असुन,टाकी भरते वेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतांना पहायला मिळत आहे.

आणी मुख्य पाईप लाईन मधुन ,कोणत्या नियमाने नळ कनेक्शन घेता येते??? असा सवाल विद्यानगरी येथील नागरिक करीत आहे. अशा अवैद्य नळ कनेक्शनमुळे, मुख्य पाईप लाईन मधुन जल प्रवाह सुरू असतो तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते.
त्यामुळे एकेकाळी पाण्यासाठी कोसो दुर भटकंती करीत असलेल्या विद्यानगरी येथील नागरिकांना , पुन्हा एकदा तोच काळ अनुभवायला मिळतो की काय.?? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे विद्यानगरी वसाहतीमध्ये वाढत चाललेल्या लोकसंख्येचा विचार करुन , वसाहतीमध्ये एक लक्ष क्षमतेची टाकी लाऊन ,विद्यानगरी येथील संपुर्ण नागरिकांची तहान भागवावी असे नागरिकांच्या वतीने नगर पालिकेकडे बोलले जात आहे.

आणी मुख्य पाईप लाईन मधुन अवैद्य नळ कनेक्शन त्वरीत बंद करून, पाण्याची होणारी नासाडी त्वरित थांबवावी. अशी मागणी विद्यानगरी येथील संस्थापक अध्यक्ष अशोक चौधरी ,भाऊसाहेब आसुटकर, प्रकाश धुळे , मडावी साहेब, सुधाकर पेचे तसेच संपुर्ण नागरिक करीत आहे.



