“कवठी” ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.कांताबाई बोरकुटे तर उपसरपंच पदी श्री. विलास बट्टे यांची निवड..
“कवठी” ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.कांताबाई बोरकुटे तर उपसरपंच पदी श्री. विलास बट्टे यांची निवड…
कवठी:- (दि13/02/2021)- 12तारखेला कवठी ग्रामपंचायत च्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री. विनोद वैध (आरोग्य विस्तार अधिकारी) आणि ग्रामसचिव अधिकारी श्री. सांगोलकर यांचे उपस्थितीत पार पडली. या निवडणुकीत कांग्रेसने बाजी मारत सरपंच आणि उपसरपंच पदावर आपले वर्चस्व स्थापन केले. सरपंच पदी सौ. कांताबाई पुरुषोत्तम बोरकुटे तर उपसरपंच पदी श्री. विलास कानू बट्टे याची निवड झाली.
यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना श्री. विजय कोरेवार, श्री. तुळशीराम बट्टे, श्री. ईश्वर बट्टे, श्री.माणिक गेडाम, श्री. टिकाराम बट्टे, श्री.भोजराज बट्टे, श्री. घोटेकार उपस्थित होते. ही निवडणूक श्री.विजय कोरेवार पं. स. सभापती सावली यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आली.



