राजुर येथील घटना- ट्रक चालकाला अपहरण करणारे राजुर येथील चार युवक आरोपी अटकेत
– 10 हजार रूपयाची केली होती मागणी .
वणी :- ट्रक चालक अपहरण प्रकरणात राजुर येथील 4 आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली .परिसरात एक ट्रक चालकाला साईड दिली नाही ,म्हणून त्याचे अपहरण करून दहा हजाराची मागणी करणारे राजूर येथील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना दुपारी अडीच वाजता घडली असून आरोपीला अटक केली आहे.


सविस्तर असे की,नॅशनल लॉरी सप्लायर या कंपनीचा ट्रकचालक बालाजी लहू पापलवार रा. माळेगाव ता. लोहा जि.नांदेड हा कंपनीमध्ये काम करीत असून वणी वरून दगडी कोळसा भरून सोलापूर ,कोल्हापूर नेहमी वरून वणी वरून जातो.तो नेहमीप्रमाणे जात असताना कंपनीचा ट्रक क्र- एम.एच 26 बी-4649 ट्रक चालक बालाजी यांनी ट्रक रोड वर उभा केला असताना वणी यवतमाळ रोड वरती बुधवारी अडीच वाजता ट्रक समोर कार क्र.MH-31-FE-7788 समोर लावून त्यातून चार युवक उतरले व कारला साईट का दिली नाही म्हणून मारहाण केली व समोरील काच फोडून ट्रकचालकास गाडीत बसवून घेऊन गेले.थोड्याच वेळाने नॅशनल लोरी सप्लायर चे एजन्सी यांना दहा हजाराची मागणी केली.

व पैसे दिले नाही तर ट्रकचालकास सोडणार नाही.असा दम फोन वर दिला व ते ट्रक चालक बालाजी या सोबत घेऊन राजुर कॉलनी कडे गेले. या प्रकरणी एजंट वसीम खान याने पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.यावरून घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचून अपहरणकर्तान कडून ट्रक चालक बालाजी पापलवार वय (22) याची सुटका केली.
या प्रकरणी चार आरोपी बालाजीचे अपहरण करणारे युवक मनोज मोती कश्यप( वय.25),सन्नी दीपक राजनलवार( वय.31क्रिष्ण विनोद सिंग (वय.26),हरिकेश यादव हे सर्व रा.राजुर कॉलरी यास अटक करुन यांचा विरुद्ध भा.द.वी 365,385,426,429 (34)कलमान्तर्गत कारवाई करुन अटक केली असून काल गुरुवारी न्यायालयात हजर केले.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव यांचा मार्गदर्शनाखाली तपास राजुर येथील पोलिस साहय्यक उपनिरीक्षक डी. बी.भादिकर करीत आहे.



