सिंदेवाही बिएसएनल टेलिफोन एक्सचेंज मधे आग
ब्रेकींग न्युज


सिंदेवाही बिएसएनल टेलिफोन एक्सचेंज मधे आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाणे कोणतीच जीवित हानी झाली नाही.आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सदरील परिसरात आग लागली. सदरील परिसरात प्रचंड अंधार असल्यानेआग नेमकी कशा मुळे लागली हे अद्यापही समजले नाही. परिसरातील परिस्थिती पाहता. जमिनीमध्ये असलेले HT केबल फार जुनाट असल्याने वायरच्या आत स्पार्क झाल्याने आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. इमारतीच्या बाहेरील परिसरातून वितरण कक्षा पर्यंत स्पार्क झाल्याने वितरण कक्षा मधे प्रचंड धुआ पसरलेला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.व आणि आग आटोक्यात आनली.सदरिल स्थळी प्रचंड लोकांची गर्दी जमा झाली.सदर घटनेची माहिती सिंदेवाही पोलिस स्टेशनला मिळाल्या बरोबर पोलिसांनी पोहचुन घटना स्थळी चोख बंदोबस्त लावला. काही वेळात तिथे अग्निशामक दल उपस्थीत झाले.



