कवठी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 52 वा पुण्यस्मृती महोत्सव व सर्व संत स्मृती महोत्सव संपन्न..

कवठी येथे वंदनीय “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांचा 52 वा पुण्यस्मृती महोत्सव व सर्व संत स्मृती महोत्सव संपन्न…
कवठी प्रतिनिधी. (दि.7-8-9 /02/2021):- आज प्रत्येक मानवाला आपले जीवन सुसंस्कारमय व आदर्श घडविण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गीताचार्य तुकाराम दादा यांच्या विचारांची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी कवठी येथे अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी मंडळी कवठी. यांनी दिनांक 7-8-9/02/2021. रोजी तीन दिवशीय राष्ट्रसंताचा 52 वा पुण्यस्मृती मोहत्सव व कर्मयोगी संत गीताचार्य तुकाराम दादा यांचा जयंती मोहत्सव आयोजित केला होता.
दि.7- सुरुवातीला सकाळी प्रांत जागृती व गावातील सर्व गावकरी मंडळी आणि नेहरू युवा केंद्र चंद्रपूर याच्या वतीने गावातील ग्रामसफाई करण्यात आली. त्यांनतर मा. प. पु. संत श्री. मुरलीधर स्वामी महाराज यांचे शुभ हस्ते घटस्थापना व दीपप्रज्वलन करून कार्यक्रम ची सुरुवात झाली. त्यांनतर भजनसंध्या, गीतगायन स्पर्धा, उत्कृष्ट ग्रामगीता वाचन स्पर्धा, सामुदायिक प्रार्थना व उपस्थितांचे मार्गदर्शन, भजन. कार्यक्रम.
दि.8- प्रांत जागृती व ग्रामसफाई, सामूहिक ध्यान, ग्रामगीता वाचन, रांगोळी स्पर्धा, भजन संध्या, निर्मला माताजीवर प्रवचन, महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम, सामुदायिक प्रार्थना, जाहीर कीर्तन (प्रबोधनपर ), साथ संगत कार्यक्रम.
दि.9- प्रांत जागृती व ग्रामसफाई, सामूहिक ध्यान, रामधून (संपूर्ण गावातून रामधून व राष्ट्रसंतांची पालखी मिरवणूक ), रामधूनवर मार्गदर्शन कार्यक्रम.
यावेळी व्यासपीठावर मा.प.पु. संत श्री. मुरलीधर स्वामी महाराज, मा.ह.भ.प. दिवाकरजी भोयर महाराज, मा. केशवजी बट्टे महाराज, मा. तुळशीरामजी घोडमारे, मा मा.जीवनदासजी किनेकार महाराज, मा.गिरमाजी भोयर,मा. हरिशचंद्र बेहार (माजी सैनिक),गणपती कोसरे, तुकारामजी बट्टे, परशुरामजी म्हशाखेत्री, तुकाराम शेरकी, मुखरूजी चिताडे, श्री.बेंडूजी पा.बोरकुटे, श्री.बंडू पा. बट्टे मार्गदर्शक :- मा. डॉ. श्री. सिवनाथजी कुंभारे अध्यक्ष मुख्य शाखा गडचिरोली, श्री. पुडके सर, श्री.वेटे दादा, श्री, पांडुरंग घोटेकर, श्री. जेंगठे दादा,श्री.रमेश बोरूले, श्री.जाणीवंत घोडमारे, श्री. सुधाकरजी गाडेवार गुरुजी, संजय मेश्राम,लालाजी मोहुर्ले, गंगाधर चुधरी, बंडू मेश्राम, श्री.विनोद बांगरे, श्री. बंडूजी आभारे, दिलीप येलकेवार, सौ, कविता चांदेकर, प्रा. श्री. रमेश वाकडे सर, मनोहरजी मलोडे, ह.भ.प.मा. भय्याजी मिरगे महाराज, मा. विनोद कोहपरे, मा. प्रा. मिलिंद सुपले सर. महिला मेळावा वं हळदीकुंकू कार्यक्रम :- मा.सौ. छायाताई डी. शेन्डे माजी सभापती पं. स. सावली, सौ.सविता सादमवार,सौ. रजनी कवाडकर,सौ. सुमनताई गोविंदवार, आरोग्य सेविका उपकेंद्र कवठी -सौ. गदेकर मॅडम, वनकर मॅडम, मेंढारकर मॅडम., सौ. शांताबाई बोरकुटे पो. पा. रुद्रापूर, सौ. इंदिराबाई राऊत ता.महिला गु.से.म. रुद्रापूर,अंगणवाडी सेविका – सौ. शशिकलाबाई राऊत,सौ. मालनबाई पूतनेलवार, सौ. बेबीबाई गेडाम., सौ. शशिकलाबाई म्हशाखेत्री महिला महासंघ बचत गट कवठी, संपूर्ण आशा वर्कर, मदतनीस व गावातील सर्व महिला मंडळ.
कीर्तनकार मा. चनफने महाराज यांचे हस्ते गोपाल काला. मा.ह.भ.प. भय्याजी मिरगे महाराज यांचे कडून लोकवर्गणीतून गोरगरिबांना वस्त्रदान वाटप.आणि इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार व स्पर्धा विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
परीक्षक :- मा. प्यारमवार सर सावली, मा. सलामे मॅडम, मा. रेकलवार सर, मा. सातेवार सर, मा. दलांजे सर.
समारोपिय कार्यक्रम :- प्रमुख मार्गदर्शक – मा. चंदू पा. मारकवार आदर्श ग्राम राजगड, मा. चेतनदादा कवाडकर प्रचारक अड्याळ टेकडी, मा. विजयभाऊ कोरेवार पं. स. सभापती सावली, मा. डॉ. तुशार बी.मर्लावार संचालक कृ. उ. बा. समिती सावली, मा. अनिलदादा पिट्टलवार ग्रामगीताचार्य भद्रावती, मा. खोब्रागडे सर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद श. सु. पा. हा. कवठी, मा. पवार सर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जि. पं. उच्च प्राथ. शाळा कवठी, मा. तुकाराम पा.सूरकर सचिव श. सु. पा. हा. कवठी, मा. सांगोलकर साहेब सचिव ग्रामपंचायत कवठी, मा. सचिनजी सिडाम पो. पा. कवठी, मा. देवाजी पा. तांगडे चकविरखलं, मा.फाले महाराज निमगाव, मा. विनोदजी धोटे माजी तं.मु.स. अध्यक्ष रुद्रापूर, मा. देवरावजी चिताडे माजी उपसरपंच कवठी, मा. टिकाराम पा. म्हशाखेत्री तं. मु. स. अध्यक्ष ग्रामपंचायत कवठी, मा. लालाजी पा. भोयर रुद्रापूर, मा. शैलेशजी रामगोंनवार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कवठी, मा. संदीपभाऊ कोसरे, सचिनभाऊ पोरटे टपाल सेवा कवठी, मा. खोजीन्द्र पा. येलमुले पुण्यनगरी पत्रकार कवठी, मा. मारोती पा. बोरकुटे ग्रामपंचायत शिपाई कवठी, आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गण, कवठी गावातील सर्व समिती, सर्व गणेश मंडळ, सर्व भजन मंडळ, सर्व पुरुष व महिला बचत गट यांचा उपस्थितीत आणि मा. चंदू पा. मारवार यांचा समारोपीय भाषणात संपन्न झाले.