हातात शिवबंधन बांधलेल्या संजय देरकर यांचे वणीत पहिल्यांदा शिवसेना स्टाइलने स्वागत…..
वणी (9 जाने.) : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी संजय देरकर यांना थेट मुंबईत मातोश्री वर नेऊन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधले.यावेळी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर काल शुक्रवारी रात्री वणी नगरीत प्रथम आगमन निमित्य त्यांचे जंगी स्वागत शिवसेना वणी शहर चे वतीने करण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख राजू तुरणकर, अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, महेश पहापले, निखिल तुरणकर, संजय गाताडे, मनीष नरपांडे,संदीप मुत्यालवार, किशोर मुत्यालवार, राजेश पारधी, मुन्ना बोथरा, गणेश जुनगरी, सचिन ठावरी यांचेसह अनेक निष्ठावंत माजी पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणा देत जंगी स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ पुतळ्याला हारार्पण करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकास हारार्पण करण्यात आले. संजय देरकर यांचे पक्ष प्रवेशाने अनेक निष्ठवंत शिवसैनिकांना आनंद झाला असून आत पक्ष भरभराटीला येईल व येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायत ,नगर परिषदेच्या निवडणुकीत याचा फार चांगला परिणाम होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.
.



