Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर….

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर….

निवडणुकीच्या आचारसंहिताही लागू…

चंद्रपूर :- गेल्या काही महिन्यांपासून राज्यात करोनाच संकट असल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र नुकत्याच सुरळीत झालेल्या पदवीधर निवडणुकानंतर आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.                                                                           एप्रिल ते डिसेबंर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आयोगाकडून 20 नोव्हेंबर 2020 रोजी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे‌. सदर कार्यक्रमानुसार 01 डिसेंबर 2020 रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे वगळून) एकूण 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच अंतिम मतदार यादी प्रसिध्द 10 डिसेंबरला प्रसिध्द झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी या सर्व ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणुक आयोगाने आज ( दि. 11 ) काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.सोबतच निवडणुकीचा आचारसहिंता लागू झाल्याचेही म्हटले आहे. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 31डिसेंबर ला छाननी. 4 जानेवारीला निवडणुक चिन्ह वाटप व उमेदवारी अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे. 15 जानेवारीला मतदान आणि 18 जानेवारीला मतमजोणी होणार असून 21 जानेवारीला अधिसुचना प्रकाशित होणार आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!