Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा*

*ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा*

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या थाळीनाद आंदोलनाची दखल*
*मुंबईत बैठक संपन्न.*

राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे राज्यभर आमदार, खासदार यांच्या घरासमोर करण्यात आलेल्या थाळीनाद आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथे शुक्रवार (दि.9) ला ओबीसी शिष्टमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी केली.
या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, इतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार, परीवहन मंत्री मा. अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री मा. दत्तात्रय भरणे, यांच्यासह मुख्य सचिव मा. सिताराम कुंटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य मा. डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर, कोंकण विभागाचे मा. चंद्रकांतजी बावकर, माजी आमदार मा. प्रकाश शेंडगे, मा. तांडेल, मा. कमलाकर दराडे, मा. बबलू कटरे, व ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्हीडीओ कॉनफरंसींगद्वारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले होते.
यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमन्त्र्यांनी दिली. ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणी प्रश्नांची आपल्याला जाणीव असुन त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करुन ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पध्दतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चीत करावीत, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.
इतर मागास बहुजण कल्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थिने सदर बैठक तात्काळ लागली, सभेत पुर्ण सहभाग घेवुन ओबीसी समाजासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

*————-चौकट———–*
*येत्या 15 ऑक्टोबरला मंत्रालयात दुपारी 2 वाजता विधानसभा अध्यक्ष मा. नाना पटोले, इतर मागास बहुजण कळ्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार, यांच्या उपस्थितीत बिंदू नामावली साठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला आमंत्रण देण्यात आले असुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. डॉ. बबन तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक मा. प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव मा. सचिन राजुरकर, उपस्थीत राहणार आहेत.*
प्र्््र््र््््

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!