वणीत रामपुऱ्यात इसमाचा खून.
वणी :- वणी मध्ये रामपुऱ्यात इसमाचा खून.
काल संध्याकाळी प्रफुल्ल गारोडे ला जबर मारहाण झाली होती.
त्यांनतर प्रफुल्ल घरी येऊन झोपी गेला, मात्र सकाळी तो उठलाच नाही, म्हणून घरच्यांनी त्याला पाहाले असता तो मृत आढळून आला.
घरच्यांचे तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह उच्चस्तरिय तपासणी करीत ग्रामीण रुग्णालया वणी येथे पाठविला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.



