Vidarbh24News

Latest Online Breaking News

बिबट्याचे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मदतीचे वाटप

कापसी येथील संस्कार या 10 वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभाग मार्फत कुटुंबियांना 4 लक्ष 75 हजार रुपयांची मदत पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हस्ते वाटप करण्यात आली.

सावली तालुक्यातील व्याहाड बुज ते कापसी मार्गावर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या कापसी येथील संस्कार सतीश बुरले (१०) या बालकाला बिबटयानी अचानक हल्ला करून उचलून नेले. शोध केले असता त्या बालकाचा मृतदेह मिळाला. वनविभागाची मदत निधी 15 लक्ष रुपयांची आहे. घटनेच्या दिवशी वनविभागाचे वतीने तात्काळ 25 हजार रुपयांची मदत कुटुंबियांना केली होती. मदतीची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते तहसिल कार्यालयात संस्कारचे कुटुंबियांना 4 लक्ष 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी, विजय मुत्यालवार, मृतकाची आई, वडील व भाऊ उपस्थित होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!