Vidarbh24News

Latest Online Breaking News

गरजूचा वाचला जीव अथांग फाउंडेशन यवतमाळची मिळाली साथ

गरजूचा वाचला जीव अथांग फाउंडेशन यवतमाळ ची मिळाली मदत

यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कुऱ्हाड या गावातील 15 वर्षीय जानवी महल्ले ही चिमुरडी अशक्तपणा, रक्ताची कमी, हिमोग्लोबिन ची कमतरता ,या कारणास्तव सोमवार दि .६/०९/२०२० रोजी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाली तिला तातडीने रक्ताची आवश्यकता आहे असे डॉक्टरांनी सांगितले कमीत कमी तीन बॉटल रक्त देणे आवश्यक असल्याचे डॉक्टर म्हणाले,

परंतु तातडीने डोनर उपलब्ध होणार नाही हे लक्षात येताच जानवी चे वडील श्री कैलास महल्ले यांनी अथांग फाउंडेशन यवतमाळ चे अध्यक्ष श्री गौरव विनोद इंगळे यांच्याशी संपर्क केला तेव्हा गौरव इंगळे यांची जराही वेळ वाया न जाऊ देता स्वतः हॉस्पिटल ला जाऊन रक्त डोनेट केले व सोबत आणखी एक मित्र बोलावून त्याकडून ही एक बॉटल उपलब्ध करून दिली.
त्याच प्रकारे कळंब येथील वयोवृद्ध सोनावणे नामक पतिपत्नी त्यांना याच दवाखान्यात भेटले. त्यांची विचारणा केली असता असे लक्षात आले कि ,सोनावणे काकू यांना सोमवर पासुन रक्ताची आवश्यकता होती परंतु त्यांचे येथे कोणीही ओळखीचे नाहीत म्हंणून रक्त मिळाले नाही .आणि वयोवृद्ध असल्याने त्यांच्या कडून जास्त प्रयत्न करणे ही शक्य नव्हते हे ऐकताच काल रात्री ९:३० ला अथांग फाउंडेशन यवतमाळ चे अध्यक्ष गौरव इंगळे यांनी लगेच ,डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून या दाम्पत्याला रात्रीच रक्त उपलब्ध करून दिले रक्त मिळताच सोनावणे काकांचे डोळे भरून आले आणि त्यांनी गौरव इंगळे यांचे अंतःकरणातून आभार मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!