Vidarbh24News

Latest Online Breaking News

शहरातील जीर्ण इमारतीकडे सावली नगरपंचायतचे दुर्लक्ष

शहरातील जीर्ण इमारतीकडे सावली नगरपंचायतचे दुर्लक्ष 

जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण?

सावली शहरातील वार्ड नंबर ७ मध्ये निलकंठ हरी नारनवरे यांचे  मातीचे घर आहे. घर पूर्णतः मोडकळीस आलेले आहे. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला रस्ता आहे. त्या रस्ताने घराशेजारील लोकं जाणे-येणे करतात व लहान मुले सुद्धा खेळत असतात. मागच्या वर्षी वार्डातील नागरिकांनी नगरपंचायतला याविषयी तक्रार केली  व या वर्षी सुद्धा तक्रार केली परंतु ना नगरपंचायत या प्रकरणाकडे लक्ष देत आहे ना घरमालक लक्ष देत. त्या पडक्या घरात कोणीच राहत नाही.

दोन दिवसापूर्वीच सावली तालुक्यातील निफंद्रा गावातील दोन वर्षाच्या मुलाचा अशीच जीर्ण इमारत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तशीच परिस्थिती सावली शहरातील दिसत आहे. त्या जीर्ण इमारतीकडे ना नगरपंचायतचे लक्ष आहे ना घरमालकाचे. उद्या ती जीर्ण इमारत पडून कोणाची जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण नगरपंचायत की घरमालक? लवकरात लवकर ती जीर्ण इमारत पाडून तिची योग्य विल्हेवाट लावावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!