Vidarbh24News

Latest Online Breaking News

डॉ. दाभोलकर स्मृती दिनाला माकपचे देशव्यापी आंदोलन

● डॉ. दाभोलकर स्मृती दिनाला माकपचे देशव्यापी आंदोलन
● वणी येथे माकप चे एसडीओ मार्फत मुखयमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यात स्मृतिदिनानिमित्त देशव्यापी आंदोलनामार्फत डॉ दाभोलकर व अन्य पुरोगामी लेखक व विचारवंत यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या सुत्रधारांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या सरकारांच्या जाहीर निषेध करीत त्यांच्या मारेकऱ्यांना व सुत्रधारांना ताबडतोब अटक करावी व अन्य शेतकरी,शेतमजूर, कामगाराच्या आणि सामान्य जनतेच्या मागण्या रेटण्यात आल्या आहेत.

 

वणी येथे माकप तर्फे एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे, प्रा कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुन्यांना आणि सुत्रकारांना ताबडतोब अटक करावी, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी, पेट्रोल-डिझेल व गॅस चे भाव निम्याने कमी करावे, केंद्रसरकाराचे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाईन शिक्षण पद्धती रद्द करा, शेती पंपाचे व घरगुती वीज बील माफ करा, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे बंद करा, शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घ्या, २०२० चे वीज विधेयक रद्द करा, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या कंपन्यांना रोखा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळेस कॉ शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे, गजानन ताकसांडे,संजय कोडापे, अमोल चटप, वामन बोबडे आदी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!