पोळा सणाच्या दिवशी अवैध दारूविक्रीत्याकडून महिलेस मारहाण*
*पोळा सणाच्या दिवशी अवैध दारूविक्रीत्याकडून महिलेस मारहाण*
*अखेर दारू विक्रेत्यास अटक*
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा उमरीपोतदार येथे दि.१८/८/२०२० रोज मंगळवार ला कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोळा सण साजरा करण्यात आला नाही. परंतु अवैध दारूचा महापूर असल्याने,एका महिलेने उठाव केल्याने तिला दारू विक्रेत्यांनी मारहाण केली.
समस्त गावकरी व महिलांनी एल्गार करून पोलिस ठाण्यात घेराव केला.
जो पर्यंत दारू विक्रीत्याला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही ठाण्यातून जानार नाही, ठाणेदारास वेठिस धरले.
ठाणेदार यांनी गावकऱ्यांचा आक्रोश बघता अवैध दारू विक्रेत्ता लेनगुरे व कुरेशी यांच्या वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, तेव्हा गावकऱ्यांना दिलासा मिळाला.



