सामाजिक अंतर राखून फ्री मेथोडिस्ट चर्च ,राजुर कॉलरीत ध्वजारोहण संपन्न
सामाजिक अंतर राखून फ्री मेथोडिस्ट चर्च ,राजुर कॉलरीत ध्वजारोहण संपन्न
वणी- तालुक्यातील सर्वात मोठा गाव समजला जाणारा तसेच मिनी इंडिया म्हणून ओळख आहे. फ्री मेथोडिस्ट चर्च,राजुरचा वतीने ध्वजारोहण करण्यात आले .covid-19 या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला आहे.
योग्य सामाजिक अंतर राखून चर्चेचे महिला कमिटी व ऑफिसियल बोर्ड मेंबरनी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी शासकीय नियमावलीनुसार अध्यक्ष गिरिश शिरमीनवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चर्चचे सचिव डेव्हिड पेरकावार ,अब्राहम कलवलवार ,पॉल ताटपेल्ली , पावलेस तालावार,आकाश पेरकावार ,बाबू कुक्कलवार हे सर्व सदस्य उपस्थित होते.



