कायर गावात शिवसेनेच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम
वणी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरानंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव घातला आहे .ही बाब लक्षात घेऊन शिवसेना कार्यकर्त्यानी एक सामाजिक बांधिलकी म्हणून वणी तालुक्यातील कायर येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख व तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कायर गावात निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम करण्यात आली .यावेळी उपस्थिती म्हणून कायर येथील शिवसेनेचे कट्टर व जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलशंखावार व पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



