Vidarbh24News

Latest Online Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ‘ करिता ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ‘ करिता ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

विदर्भ 24 न्यूज
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी,राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१ ९ -२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ . करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ‘ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत . ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे . अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला,रेशनकार्ड , आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, २ फोटो.पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ ( मर्या ) मुंबई – गृहनिर्माण भवन , कलानगर, तळमजला,रुम नं. ३३, बांद्रा ( पू ) , मुंबई -४०००५१ या पत्त्यावर दि . ०९ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ ( मर्या ) , जिल्हा कार्यालय मुंबई शहर – उपनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!