Vidarbh24News

Latest Online Breaking News

दुसऱ्याच्या शेतीवर मजुरी  करणारी तृप्ती आली तालुक्यात प्रथम

दुसऱ्याच्या शेतीवर मजुरी  करणारी तृप्ती आली तालुक्यात प्रथम

विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील कु. तृप्ती ज्ञानेश्वर मुसद्दीवार या मुलीने कला विभागातून सावली तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तृप्तीला एकूण 86.30 टक्के गुण मिळाले आहे. प्रत्येक विषयात प्राविण्यासह गुण मिळविले आहे.
उसेगाव पासून सावली हे तालुक्याचे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावातून दररोज सकाळी सायकलने शाळेला येणे आणि परत जावून घरकाम-शेतीकाम करून अभ्यास करणे असे तृप्तीचे अभ्यासाचे नियोजन होते. दररोज शाळेत जावून शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे हे अतिशय आवश्यक आहे. तरच अभ्यास करणे सोपे जाते. सर्व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने या यशापर्यंत पोहचू शकली सोबतच आई-वडील आणि घरच्या वडिलधारी व्यक्तींने दिलेले बळ मला यशा पर्यंत पोहचवू शकले.अशी माहिती तृप्तीने दिली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!