Vidarbh24News

Latest Online Breaking News

क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरने केला महिलेवर बलात्कार..

पीडित महिलेच्या निवेदनाच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल..

विदर्भ 24 न्यूज
वृत्तसंस्था / नवी मुंबई : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. क्वारंटाईन सेंटरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे पुढे आले आहे. पनवेल पोलिसांच्या माहितीनुसार नवी मुंबईतील क्वारंटाईन केंद्रावर एका डॉक्टरने ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. पीडीत महिलेलाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. पनवेल पोलिसांनी पीडित महिलेच्या निवेदनाच्या आधारे आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ आणि ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.ही गुरुवारीची लैंगिक अत्याचाराची घटना आहे आणि आरोपी डॉक्टर आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी डॉक्टरने त्या महिलेला काही त्रास होत आहे का,असे विचारले . त्यावेळी महिलेने सांगितले की, शरीर दुखत आहे. यावर आरोपी डॉक्टर म्हणाला की मालिश करावी लागेल. त्यानंतर आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला आणि आरोपी दोघेही कोविड -१९ संक्रमित आहेत. दोघांवर क्वारंटाईन केंद्रावर उपचार सुरु आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर कोरोना संसर्गाचा बळी आहे. या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणाले , आरोपीला अटक करण्यात आली आहे असुन त्याची कोविङ -१९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

संपर्क-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!