Vidarbh24News

Latest Online Breaking News

बोथलीतील मादगी समाजाच्या कथित जातीय अपमानप्रकरणी महिला आक्रमक

सावली (चंद्रपूर) : सावली तालुक्यातील मौजा बोथली येथे मादगी समाजातील महिलांचा कथित जातीय अपमान करण्यात आल्याच्या प्रकरणावरून समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा जातिवाचक व अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याची तक्रार समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

बोथली येथील श्री संयुक्त शारदा महिला मंडळाच्या शारदोत्सवादरम्यान मादगी समाजातील महिलांना जातीच्या आधारावर अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. यासंदर्भात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सावली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, तक्रार करूनही अपेक्षित कायदेशीर कार्यवाही झाली नसल्याची नाराजी पीडित महिलांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा मादगी समाजातील महिलांविषयी सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक व अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. शारदा मंडळाच्या सदस्य शिवानी स्वप्नील निरुडवार हिने असे वक्तव्य केल्याचे पीडित महिलांचे म्हणणे असून, यावेळी एक गृहस्थही उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कथित प्रकारामुळे महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा आयु. मायाताई मोहुर्ले यांच्या नेतृत्वाखाली ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल यांना निवेदन सादर करण्यात आले. पीडित महिलांना न्याय मिळावा, दोन्ही तक्रारींची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनातून २७ ऑक्टोबरच्या मूळ तक्रारीवर तातडीने कार्यवाही करणे, २९ ऑक्टोबरच्या कथित घटनेची स्वतंत्र नोंद घेऊन चौकशी करणे, पीडित महिला व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविणे, उपलब्ध ध्वनिचित्रफिती व अन्य पुराव्यांची तपासणी करणे, तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ व इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव किंवा धमकी येऊ नये, यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

५ नोव्हेंबरपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास सावली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा

प्रशासनाला ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ठोस कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कार्यवाही न झाल्यास पोलीस स्टेशन सावली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या नेतृत्वाखाली मादगी समाज बांधवांच्या वतीने शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

‘आमचा लढा कोणत्याही समाजाविरुद्ध नसून जातीय भेदभाव, अन्याय आणि महिलांच्या अपमानाविरुद्ध आहे. पीडित महिलांना न्याय मिळेपर्यंत कायदेशीर व संविधानिक मार्गाने लढा सुरूच राहील,’ अशी भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.

महिलांचा सन्मान, सामाजिक समानता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना व विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!