Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पिकअप वाहन पलटी झाल्याने 30 महिला गंभीर जखमी**

” डोनाळा वळणावरील घटना”

“माजी खास.अशोक नेते यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट”

*सावली*–सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिला मंडळी यांनी उन्हाळी रोजगाराची सोय उपलब्ध नसल्याने महिलांनी जवळपास 30 महिलांचा गट तयार करून गावागावात लग्न समारंभ व इतरत्र कार्यक्रमांमध्येजेवण वाढण्याकरिता याच गटाच्या माध्यमातून जात असतात, असेच आज गावातील महिला मंडळी अंतरगाव येथे असलेल्या लग्न समारंभाचे जेवण वाढण्याचे टेंडर घेतल्यानंतर डोनाळ्यावरून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पीक अप गाडी जवळपास 30 महिला व काही बालक घेऊन पिक अप वाहनाने जात असताना डोनाळा ते उपरी नक्टू भोयर यांच्या शेता जवळील वळणावरती पिक अप चा तोल गेल्याने ड्रायव्हर चा नियंत्रण सुटले आणि पिक अप जागीच पलटल्यामुळे गाडीत भरलेले सर्व महिला व बालक एकमेकांवर काही रस्त्यावर तर काही शेतातील बांधी मध्ये पडले, अनेक महिलांना किरकोळ तर काही ना गंभीर जखमा झाले असून काही गंभीर जखमी आहेत सदर घटना हळूहळू वाऱ्यासाठी पसरू लागली .

घटना माहित होताच डोनाळा , कढोली व उपरी व जवळपास असलेले गावातील नागरिकांनि एकच गर्दी केली घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले अनेक लोक धावपळ करत घटनास्थळी पोहोचले जखमींना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आली असून जवळपास 30 लोकांवर जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहे , सदर अपघातातची माहिती भाजपा कार्यकर्ते कडुन माहीती होताच,माजी खासदार.अशोक नेते यांनी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती असलेल्या जखमींना रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व शल्यचिकित्सक डॉ छाया उईके यांच्याशी चर्चा करून जखमींचा आढावा घेतला,आज माजी खासदार अशोक नेते यांनी आपला नियोजीत दौरा रद्द करुन ,डोनाळा अपघातातील जखमींना योग्य उपचारासाठी मदत केली….

यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला एवढ्या मोठ्या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याने अपघात पाहून अनेक लोका कडून तर्कवितर्क लावला जात आहे.

साईड बंब च काम तुरंत करून देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!