Vidarbh24News

Latest Online Breaking News

*व्याहाड खुर्द शाखेतून सहा कोटी सोळा लाखांचे पीक कर्ज वाटप*

सावली : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा व्याहाड खुर्द तर्फे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून रु. 6,16,00,000/- (सहा कोटी सोळा लाख )इतक्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून वेळेवर आर्थिक सहाय्य मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके तसेच इतर शेतीसाठी आवश्यक खर्च भागविण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

या अंतर्गत व्याहाड सेवा सहकारी संस्था, बोथली सेवा सहकारी संस्था, निमगाव सेवा सहकारी संस्था व केरोडा सेवा सहकारी संस्था यांच्या शेतकरी सभासदांना कर्जाचा लाभ देण्यात आला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामासाठी शेतीची तयारी गतीमान होणार आहे.

या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या शुभहस्ते कर्ज वाटप करण्यात आले. तसेच सावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाजपा नेते श्री. मुन्ना भाऊ स्वामी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी व्याहाड सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. दीपक भाऊ जवादे, बोथली सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप भाऊ गड्डमवार, निमगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. चरणदासजी चिमूरकर, केरोडा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर चलाख, तसेच व्यवस्थापक श्री. विनोद पाझारे, निरीक्षक ननन्नावरे, गटसचिव श्री. जी. एफ. तितीरमारे, श्री. एस. एम. काळबांधे, सौ. के. पी. बामनकर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांना सक्षम करण्यासाठी बँक सातत्याने कार्यरत आहे. वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे, सोप्या प्रक्रियेद्वारे लाभ देणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी कर्जाचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून उत्पादनवाढ साध्य करावी व वेळेवर परतफेड करून बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखेच्या समस्त कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!