Vidarbh24News

Latest Online Breaking News

*गो मातेला राष्ट्रमाता घोषित करा- संत मुरलीधर

“तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन”

“संत मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात गो सन्मान रॅली”

*सावली*- २७ एप्रिल ते २७ जुलाई या कालावधीत गो- सन्मान दिवस म्हणून देशभर ,’गो सन्मान अभिमानाला” सुरुवात करण्यात आली आहे,त्याचाच एक भाग म्हणून संत मुरलीधर स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली गो मातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करा,या जयघोषात नुकतेच तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील हिरापुर, कवठी,पारडी,रुद्रापुर,चांदापुर,बोथली,साखरी,सिर्सी,हरांबा,चांदापुर,उसेगाव,भट्टेजांब,केशरवाही,चकपिरंजी, किसाननगर,पेंढारी, आणि सावली शहरासह तालुक्यातील अनेक प्रेमी बांधवाचा समावेश होता,
विशेष म्हणजे सर्वत्र गो वंश तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे,त्यांची हत्या थांबवावी , तसेच गो माता ही मातेसमान समान आहे,तिचे रक्षण करुन तिला राष्टमातेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी आज सोमवार (२७ ) ला संत मुरलीधर स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सावली मुख्यालयातून गो प्रेमी बांधवांच्या उपस्थित गो मातेची रैली काढून निवेदन देण्यात आले…
राज्यात तसेच ग्रामीण भागात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “गो सन्मान आव्हान अभियान” या उपक्रमाला सर्वत्र सुरुवात झाली ,गोरक्षण, गो-सेवा आणि गो-मातेचा सन्मान यासाठी समाजातील विविध घटक एकत्र येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
अभियानामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे गोवंशाचे संरक्षण, भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना, शेतकऱ्यांना आधार आणि गोसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आहे,पशुवैद्यकीय शिबिरे आणि गोदुग्ध उत्पादने प्रोत्साहन यावर विशेष भर दिला जात आहे.
गो मातेची सेवा हीच खरी मानवसेवा” या संदेशाने प्रेरित होऊन समाजातील सर्व स्तरातून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला, विशेष म्हणजे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ,तालुका सावली ची प्रामुख्याने उपस्थिती होती…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!