Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सार्वजनिक अष्टविनायक गणेश मंडळातर्फे रक्त दान शिबिरास

*महिलांचाही प्रतिसाद*

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)

सावली पासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या बोथली येथे सार्वजनिक अष्टविनायक गणेश मंडळ बोथली व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा बोथली येथे करण्यात आले.
गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबविने महत्वाचे आहे त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते.रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे तालुक्यातील बोथली हे पहिले गाव आहे असे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर बोलत होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच सुशील नरेड्डीवार,उपसरपंच नरेश गड्डमवार,पत्रकार सूरज बोम्मावार,पत्रकार
प्रा.शेखर प्यारमवार,चारुदत्त राऊत जिल्हा रुग्णालय गडचिरोली,ताराचंद खोब्रागडे पोलिस पाटील, दुमाजी आदर्लावार मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.
आयोजित रक्तदान शिबिरात गावातील ३४ युवक, पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराचे यशस्वीतेसाठी निलेश पूटकमवार,नितेश रामीडवार, दुर्वास आत्राम,उत्तम दलांजे,राहुल मुठ्ठावार,अरविंद मुट्ठावार,अभिजीत पाडेवार,कमलेश रामिडवार,प्रदीप चौधरी,मंगेश कुंभरे,राजेंद्र नीरुडवार भोजराज निरुडवार,प्रशांत दलांजे, शुभम कुंभरे,अतुल रामिडवार,विवेक कुंभरे,विवेक मुठ्ठावार,कांचन पोवरे,तसेच अष्टविनायक गणेश मंडळातील सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन ताराचंद खोब्रागडे यांनी केले तर.आभार अशोक निरुडवार यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!