Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रम संपन्न

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे कला , वाणिज्य व विज्ञान विभागाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दि.1 ते 7 ऑगस्ट सात दिवसीय इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विजयराव शेंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोबरागडे उपस्थित होते या सात दिवसीय इंडक्शन प्रोग्राम मध्ये महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ‘ संधी व आव्हाने ‘या विषयावर प्रा. संदीप देशमुख , प्रा. प्रशांत वासाडे डॉ. विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाज व स्कॉलरशिप याबद्दल संजयजी पडोळे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांची व अँटी रॅगिंग बद्दल डॉ. दिलीप कामडी यांनी माहिती दिली. सांस्कृतिक उपक्रमांची माहिती प्रा.स्मिता राऊत यांनी दिली. ग्रंथालय विभाग बद्दलची माहिती प्रा. दिलीप सोनटक्के यांनी दिली. विद्यार्थी कल्याण विभागची माहिती डॉ. प्रफुल वैराळे , महिला तक्रार निवारण समिती याबद्दलची माहिती प्रा. किरण बोरकर यांनी दिली. करियर गायडन्स याबद्दल प्राध्यापक विजय सिंग पवार यांनी माहिती दिली. महाविद्यालयातील बेस्ट प्रॅक्टिस विद्यार्थी सहायता निधी व ऍग्रो फोरम याविषयी डॉ.सचिन चौधरी, वार्षिकांक याविषयी डॉ. रामचंद्र वासेकर आणि मेंटरशिप याबद्दल प्रा. सगानंद बागडे, फीडबॅक फॉर्म विषयी डॉ. रागिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा परिचय व विद्यार्थीचा विविध उपक्रमातील सहभाग वाढावा या हेतूने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सात दिवशीय् इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन चौधरी , प्रा. प्रशांत वासाडे प्रा. सगानंद बागडे यांनी काम पाहिले समारोपीय आभार प्रा. आशिष शेंडे यांनी मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!