*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थी रोशन यशवंत गेडाम ( मराठी), रागिनी गणेश उमलवार (प्राणीशास्त्र), ओमकार नरेंद्र भोयर (प्राणीशास्त्र), यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र वासेकर , वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. देवीलाल वताखेरे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रकाश घागरगुंडे , डॉ. किरण कापगते, डॉ. सचिन चौधरी, प्रा. आशिष शेंडे यांच्या उपस्थितीत सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सेट परीक्षा पास झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार संस्थेचे सचिव राजबाळ संगीडवार, उपाध्यक्ष अनिलजी स्वामी, प्राचार्य अशोक खोब्रागडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश आम्हाला प्राप्त झाले असून आमच्या यशात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे आमच्या यशाचे श्रेय महाविद्यालयास आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी सत्कारा प्रसंगी व्यक्त केली.



