*गट विकास अधिकारी यांची बोथली ग्रामपंचायतीला भेट
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
आज दिनांक २८/०६/२०२३ ला सावली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी गुड मॉर्निंग पथक कार्यक्रमातर्गत ग्रामपंचायत बोथली व चारगाव या ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. स्वच्छ भारत मिशन व जे. जे.एम.अंतर्गत गावातील ओडीएफ प्लस उद्देशाने वैयक्तिक शौचालय ची पाहणी,पाणी नमुने तपासणी, नळ जोडणीची पाहणी,मनरेगा अंतर्गत कामाची पाहणी,घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन कामाची पाहणी केली.यासोबतच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आले. यावेळी प्रमोद जोंनमवार एकात्मिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी ,मेश्राम सर (आरोग्य वि.) घरकुल कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.



