Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पोलिस भरतीत नॉनक्रिमलेअर असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे- अविनाश पाल*

राज्यातील पोलिस भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या ओबीसी उमेदवारांना १ एप्रिल, २०२१ ते ३१मार्च २०२२ या आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.या मुळे अनेक ओबीसी, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारा मध्ये नॉन क्रिमिलेअर प्रमापत्राबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे आज दिनांक १६ नोव्हेंबर ला भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांनी श्री मा. ना. अतुलजी सावे मंत्री इतर बहुजन समाज कल्याण यांना निवेदन देण्यात आले , निवेदनात दिनांक 1 एप्रिल 2021 व 31 मार्च 2022 वित्तीय वर्षातील प्रमाणपत्र ऐवजी फक्त ज्या उमेदवार कडे ग्राहय सर्टिफिकेट आहे अशा उमेदवारांना पात्र करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
भरतीत शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई या पदांसाठी भरतीची सूचना जाहीर करण्यात आली. सुमारे ३८ घटकांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ९ नोव्हेंबरपासून अर्ज सादर करण्यास सुरुवातही झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३३ वर्षे वयोमर्यादा आहे. भरतीसंबंधी आवश्यक कागदपत्रांच्या यादीतील सातव्या रकान्यात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच सामाजिक आरक्षणासंदर्भात दिशानिर्देशही देण्यात आले. यामध्ये उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र छाननीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना भाजपा तालुकाध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,जितेश सोनटक्के उपसरपंच ग्रामपंचायत डोनाळा व भाजपा ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
21:24