Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोना अपडेट -चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये 7 रुग्णांना सुटी ; ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 3

*कुणाल उंदीरवाडे/विदर्भ 24 न्युज*

*शहर प्रतिनिधी, सिंदेवाही*

*मोबाईल न. 8806370336*

Ø  आतापर्यंत 20 रुग्ण कोरोना मुक्त

Ø  ॲक्टिव 3 रुग्णांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर,दि. 2 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1 हजार 13 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23 नमुने, निगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679 नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8 हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून रेडझोन मधून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. नवी दिल्ली( एक रूग्ण ), मुंबई( चार रुग्ण), ठाणे ( दोन रुग्ण), पुणे ( सहा रूग्ण ), यवतमाळ ( दोन रुग्ण ), नाशिक (तीन रुग्ण) तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासातील संख्या 5 आहे.

चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण ), व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ),31मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 3 आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!