Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी मोक्षधाम येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात जबर मारहाण…   

वणी (30.मार्च ) :– वणी येथे अंत्यविधी सारख्या दुःखद क्षणी जुन्या वादाचा वचपा काढत मानवतेला कलंकित करणारा हा प्रकार समोर आला. वणी येथील मोक्षधाम येथे पूर्व वैमनस्यततून दोन गटात जबर हाणामारी झाल्याची घटना काल २९ मार्चला सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली. दोन गटात झालेल्या या हाणामारीत मोक्षधाम येथे कार्यरत असलेला मजूर जख्मी झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जमाव पांगविल्याने मोठा अनर्थ टळला. या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत १६ आरोपींना अटक केली आहे.

मोक्षधाम येथील मजुराने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. अंत्यविधी सारख्या दुःखद क्षणी जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता मोक्षधाम येथे गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी केलेला राडा खेदजनक असून मानवतेला कलंकित करणारा आहे. अशा या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची  रंगनाथ नगर येथील आजारी असलेली व्यक्ती २८ मार्चला मृत्यूमुखी पडल्यानंतर त्या व्यक्तीचा अंत्यविधी सोहळा २९ मार्चला करण्याचे ठरले. अंतयात्रा मोक्षधाम येथे पोहचल्यानंतर त्याठिकाणी अंत्यविधी सुरु असतांना सेवानगर व अंत्यविधीत सहभागी झालेल्या रंगनाथ नगर येथील युवकांमध्ये जुन्या वैमनस्यातून परत वाद चिघळला व दोन्ही गट आमने सामने आल्याने त्यांच्यात जबर हाणामारी सुरु झाली. लाठ्या काठ्या व दगड गोट्यांनी एकमेकांवर हल्ले चढविण्यात आले. एवढेच नाही तर सरणाच्या लाकडांनीही एकमेकांना मारण्यात आले. या हाणामारीत मोक्षधाम येथे काम करणारा मजूर कैलास रामेश्वर नवघरे (३५) रा. रामपूरा वार्ड हा जख्मी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अंत्यविधीत राडा करण्याऱ्या काही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले. तर काही आरोपींना माहितीच्या आधारावरून अटक करून पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी एकूण १६ आरोपींना अटक केली आहे. कैलास नवघरे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवम संजय बिसमोरे (२२), रितीक अनिल बिसमोरे (१९), अनिकेत मोगरे, अंकुश मोगरे, अभिषेक ताराचंद, रोहित पांडे, प्रितम ठावरी, रितेश तोमस्कर, मारोती पेडावार, आकाश दारुंडे, चंदू संजय बिसमोरे सर्व रा. सेवानगर, स्वप्निल राऊत, चेतन राऊत, ईश्वर देठे, निलेश पाटील, बबलू चुराणकर सर्व रा. रंगनाथ नगर यांचा समावेश असून त्यांच्यावर भांदवि च्या कलम

१४७, १४८, १४९, १८८, २६९, २४९, ३२४, ३२३, ४२७, ५०६ तसेच सहकलम १३५ मुपोका R/W साथ रोग सन १८९७ चे कलम २ व ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामोर तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!