Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर येथे लॉकडाऊनचा फायदा घेत जागोजागी खुलेआम अवैद्य दारू विक्री व मटका पट्टी सुरु …..

★राजीव गांधी चौक ते बाज़ारवाड़ी बनले अवैद्यदारू व अवैद्य मटक्याचे माहेरघर…

वणी( 17.मार्च ) :– राजुर येथे लॉकडाऊचा फायदा घेत जागोजागी खुलेआम अवैद्य दारू विक्री सुरु आहे.गावातील हृदय समजले जाणारे म्हणजे चौक..  गावातील अश्या अनेक चौकात अवैध दारू व अवैध मटका धंदे चांगलेच फोफावल्याचे दिसत आहे. महिलांना रस्त्यावर येणे व जाणे करण्यासाठी नाहक त्रास सहन करावे लागत आहे.अवैध दारू व मटक्याने गावात महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे.

अवैद्य दारू वअवैद्य मटक्यावर कारवाई कधी ?

सायंकाळला बाहेर फिरण्यासाठी जाणे सुद्धा कठीण झाले आहे.सद्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत अवैद्य व्यवसायिक परीसरात सायंकाळी ५ वाजल्या नंतर जागोजागी दारू व्यवसाय सुरू होते.

विशेष म्हणजे या परिसरातील अवैध दारू विक्रेते भरदिवसा दारू दुकाना मधुन दारूचा साठा घरी आणुन जमा करतात आणि सायंकाळी ५ वाजले कि, यांचे दुकान जागोजागी खुलेआम चालु होते. तर दिवसभर जागोजागी मटका पट्टी सुरू असते. आता महत्वाचा प्रश्न  असा की, महिलांनी बाजार रस्त्यावर जायचे नाही का ? प्रशासनाला स्पष्ट सवाल केला आहे. या भागात अवैध व्यवसाय सुरू असुन मात्र या परिसरातील संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष कसे ? असाही प्रश्न उपस्थित केला जात कुणाचातरी आशिर्वादानेच सर्व काही सुरळीत चालू असल्याचे बोलल्या जात आहे.

अवैध्य दारू व्यवसाय करणारे  प्रशासनाच्या कारवाईला जराही घाबरत का नाहीत. गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या देशी- विदेशी दारुची राजरोसपणे दारू विक्री होते आहे. या अवैध्य दारू व्यवसायिकांना पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे जराही भय वाटत नाही का ? आणी  वारंवार बातम्या प्रकाशित झाल्यावरही पोलिस प्रशासन पाठपुरावा करीत नाही का ? अशी स्पष्ट प्रतिक्रिया गावकरी करीत आहे.त्यामुळे आता या परिसराकडे खुद्द ठाणेदाराणेच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही बोलल्या जात आहे..आता प्रशासन राजुर भागाकडे अवैद्य व्यवसायींकासाठी काय भूमिका घेईल .हे बघणे गरजेचे…!

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!