वणीतिल सुप्रसिद्ध सेवन स्टारचे आधारस्तंभ हाजी हारुण हाजी जिकर चीनी यांचे अल्पशा आजाराने निधन
🙏निधन वार्ता🙏

वणी (16 मार्च ):– शहरातील प्रतिष्ठित असलेले प्रतिष्ठान सेवन स्टार चे सुप्रसिद्ध संस्थापक हाजी हारूण हाजी जिकर चिनी यांचे आज दिनांक 16 मार्चला दुपारी 2.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.ते वयाने 82 वर्षांचे होते व यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्या मोठा मान होता .तसेच नगीना मस्जिद येथे विश्वसनिय म्हणून सुद्धा विशेष ओळख होती.

त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात जणू एक तारा हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.वणीतील ज्येष्ठ पत्रकार फारुख चिनी व जब्बार चिनी यांचे ते वडील होते.
हाजी हारूण हाजी जिकर चिनी यांच्यावर अंत्यविधी बुधवारला शाम टाकीजच्या जवळील राहत्या घरी बुधवारी सकाळी 10.वाजे पर्यंत दर्शनासाठी त्यांचे पार्थिव शरीर ठेवन्यात येईल .त्यांच्या पश्चात पत्नी ,सात मुले ,नातवंड व सून असा आप्तपरिवार आहे.




