बघा हो !!!!!!!! ISO व IAF नामांकन प्राप्त ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार…….
★ ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच घाणीचे वास्तव्य.
वणी (16.मार्च :- वणी तालुक्यातील ISO व IAF नामांकन प्राप्त ग्रामपंचायत ने अतिक्रमण केल्याचे चित्र कार्यालयला लागून बांधलेल्या नालीवरून दिसून येते आहे, स्वतः जबाबदार कार्यालय जर अस करत असेल तर गावातील नागरिक का करणार नाही ? अहो कुंपण जर शेत खात असेल तर राखणदार कोण राहील? लालगुडा ग्रामपंचायतचा हा असाच अजब प्रकार दिसत आहे.
राज्य महामार्गावर वरून लालगुडा गावात येताना जिल्हा परिषद शाळा आहे व त्यानंतर ग्राम पंचायत आहे. या रस्त्यावरून जाता येताना चार- चाकी, तीन-चाकी वाहन एका वेळेस जाऊ शकत नाही.
कारण ग्राम पंचायत ने बांधलेली नालीचे बाहेर तार कंपाउंड काढल्याने हा रस्ता अरुंद झाला. ग्राम पंचायत ने नाली बांधली व त्या नाली ला जाळीच्या आत आपल्या हद्दीत घेतल्याने रस्ता खूप लहान झाला,असून एका वेळेस एकच वाहन जाते.
शासन किती योग्यतेने काम करते याचे चित्र पाहायला मिळत आहे.अंडरग्राऊंड नाली बांधली आहे. मात्र त्यातही कामाचा दर्जा व नियोजन नाही असं या ISO नामांकन प्राप्त ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार दिसतो. अंडरग्राऊंड नालीचे पाणी ग्राम पंचायत च्या जवळ थांबते व त्यामुळे तेथील नागरिकांना खूप त्रास असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासकीय कार्यालयाची ही अवस्था असेल तर बाकी गावात घाणीचे आणि अतिक्रमण बद्दल ग्रामपंचायत चे धोरण काय असेल या बद्दल न बोललेलं बर अशी चर्चा गावकरी करताना दिसून येत आहे.



