Vidarbh24News

Latest Online Breaking News

10 फेब्रुवारी हा दिवस दारू तस्करांसाठी ठरला काळा ….वणी पोलिसांची शहरात दहशत मात्र कायम

वणी पोलिसांचे घुग्गुस रोड व बेलदारपूरा येथे कारवाई

वणी: बुधवार 10 फेब्रुवारी हा दिवस दारू तस्करांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेड करून जवळपास 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने केली आहे. या तस्करतील एका आरोपीला अटक केली तर एक जण गाडी सोडून पळून जाण्याचा यशस्वी झाला. 

बुधवार 10 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एक वाहन चंद्रपूर येथे दारू घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांना वणी घुग्गुस रोडवर सदर वाहन आढळून आले. पोलीस या ठिकाणी जाताच आरोपी हा वाहनाचा दरवाजा उघडून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग केला .परंतु आरोपी मिळून आला नाही. या ठिकाणाहून एक स्कापीओ वाहन क्रमांक MH14 AE6959 व 49 हजार 400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. 

दुसरी कारवाई ही 10 फेब्रुवारी रात्री 1.20 वाजताच्या सुमारास केली. ही कारवाई बेलदारपूरा येथील गणोअति मंदिरापुढे केली. या कारवाईत एक इंडिका विस्टा वाहन क्रमांक MH34 AA 9337 दारू व वाहन एकूण किंमत 1 लाख 73  हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी रामदास साधुजी निखाडे (39) रा. बेलदारपूरा यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीवर कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) (इ) नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाई डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक , खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी शिवाजी टिपूर्णे, प्रदीप ठाकरे, विजय वानखेडे, इकबाल शेख, रवी इसनकर, परेश मानकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार, अशोक दरेकर, दडमल यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!